पुणे / शिरूर : ‘नेत्यांनी संयमाने वागायचे असते आणि पराभव स्वीकारायचा असतो. पराभव का झाला, हे पवार यांना माहिती आहे. त्यांनी जनतेचे, कार्यकर्त्यंचे ऐकावे, खोटे सांगणाऱ्या नेत्यांचे ऐकू नये,’ अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोल्हापूर येथे बोलताना विधासभा निवडणुकीतील मतांची आणि उमेदवारांची आकेडवारी देताना निकालाबाबत भाष्य केले होते. त्यानंतर ‘एक्स’ या समाजमाध्यातूनही लोकसभेची आकडेवारील देत फडणवीस यांनी त्याला उत्तर दिले होते. या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे मळगंगा मंदीर (कुंडा ) जवळ कोपर्डी येथील पीडीत महिलेच्या घरातील लग्नसमारंभाला फडणवीस रविवारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा पवार यांच्यावर टीका केली.
हेही वाचा >>>पुणे : बावधन भागातील इमारतीत मोठी आग, स्टुडिओतील साहित्य जळून खाक
‘शरद पवार प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत. अशा नेत्याने संयमाने वागायचे असते. पराभव स्वीकारायचा असतो. कार्यकर्त्यांच्या दबावाखाली पवार असे वागत असतील. मात्र,पराभव काय झाला, हे पवार यांना माहिती आहे. त्यांनी जनतेचे ऐकावे. कार्यकर्ते आणि खोटे बोलणाऱ्या नेत्यांचे ऐकू नये. लोकशाहीवरील लोकांचा विश्वास उडेल, अशी कृती पवार यांनी करू नये,’ असे फडणवीस यांनी सांगितले.