मुख्यमंत्र्यांनी आमदार मुक्ता टिळक यांची भेट घेत प्रकृतीबाबात केली विचारपूस
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांना भेट दर्शन घेतले, आरतीही केली. मानाचा पाचवा केसरी वाडयातील गणपतीचे दर्शन घेतल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महिन्यापासून आजारी असलेल्या कसबा विधान सभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली.
हेही वाचा : पुणे : २०१४ ला कोणी दगा फटका केला हे १२ कोटी जनतेला माहिती ; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
” ताई, तुम्ही काळजी घ्या,लवकर बरे व्हा आणि पुन्हा पुढच्या अधिवेशनामध्ये यायचं आहे” असेही मुख्यमंत्री मुक्ता टिळक यांना म्हणाले. दरम्यान या छोटेखानी भेटीत मुख्यमंत्री यांनी विविध मुद्द्यांवर मुक्ता टिळक यांच्याशी चर्चाही केली. जुने वाडे, जुन्या इमारती यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न टिळक यांनी शिंदे यांच्यापुढे मांडला. तसंच कसबा मतदारसंघातील पार्किंग समस्येचा विषयही मुख्यमंत्र्यांना सांगितला.
तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अधिकारी भूषण गगरानी यांना थेट फोन लावला.”हॅलो, मी आता पुण्यात आहे. मुक्ता ताई टिळक यांच्या मतदार संघात मोठ्या प्रमाणावर ४० वर्षाहुन जुने वाडे,इमारती आहेत. तंसच तिथे राहणार्या नागरिकांचा पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो मार्गी लागला पाहिजे आणि काही तरी मार्ग काढा”,अशा सूचना देखील एकनाथ शिंदे यांनी सचिवांना केल्या.