पिंपरी- चिंचवड : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज आकुर्डीत मुक्कामी असणार आहे. उद्योग नगरी पिंपरी- चिंचवडमध्ये तुकोबांच्या पालखीचं आगमन होताच, अत्यंत भक्तिमय वातावरणात पिंपरी- चिंचवडकरांनी स्वागत केलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी तुकोबांच्या पालखीचे स्वागत करत पालखीचे सारथ्य केले आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ३३९ व्या पालखी सोहळ्याचं शुक्रवारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. इनामदार वाड्यातील पहिल्या मुक्कामानंतर पालखी देहू जवळच्या अनगड शहा बाबा दर्गा जवळ विसावली. तिथं आरती करण्यात आली. मग, पुन्हा पिंपरी- चिंचवडच्या दिशेने तुकोबांची ही पालखी टाळ- मृदुंगाच्या गजरात मार्गस्थ झाली. सायंकाळच्या सुमारास तुकोबांच्या पालखीचे पिंपरी- चिंचवडमध्ये आगमन झाले.

आणखी वाचा-मुद्रांक अभय योजनेला मुदतवाढ? आज मुदत संपणार

मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांनी पालखीचे स्वागत केलं. पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पालखीचे सारथ्य केलं. उपस्थितीत वारकऱ्यांना अभिवादन केलं. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात तुकोबांची पालखी आज मुक्कामी असून उद्या सकाळी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.

पैलवान आमदार महेश लांडगेंची केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांना कडाडून मिठी!

आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्या निमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले मुरलीधर मोहोळ हे महेश लांडगे यांचे भाजपमधील सहकारी असून ते भेटताच महेश लांडगे यांनी मुरलीधर मोहोळ यांना कडकडून मिठी मारली. कौतुक करत अभिनंदन हे केलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.