पुणे : पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, मंगळवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.
पुणे शहर व जिल्ह्यातील नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर मुंबईला परतण्यापूर्वी शिंदे यांनी बापट यांची भेट घेतली व त्यांच्या समवेत उदय सामंत, तानाजी सावंत, विजय शिवतारे, युवासेना सचिव किरण साळी, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले आणि जिल्हाप्रमुख रमेश कोंडे तेथे उपस्थित होते.
गिरीश बापट यांनीही यावेळी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. बापट यांना एकदोन दिवसात रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळणार असून त्यानंतर ते दिल्लीला रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.