राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदार अण्णा बनसोडे यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान, ही सदिच्छा भेट असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात येऊन भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि आमदार बनसोडे हे एकाच गाडीतून प्रवास केला होता. तेव्हा देखील अशीच चर्चा झाली होती. दरम्यान, अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा असून ते पक्ष चाचपणी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. ते अजित पवार यांचे विश्वासू आणि जवळचे आमदार म्हणून ओळखले जातात.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अण्णा बनसोडे हे भविष्यात शिवसेनेत प्रवेश करणार का? अशी चर्चा देखील रंगली आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला असता सदिच्छा भेट असल्याचं सांगत अण्णा बनसोडे हे जवळचे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अण्णा बनसोडे यांनी देखील सदिच्छा भेट म्हटलं आहे.