कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश आणि चिरंजीव कुणाल यांची गुरूवारी केसरीवाड्यात भेट घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत जवळपास वीस मिनिटे चर्चा करण्यात आली. यावेळी शैलेश टिळक,कुणाल टिळक आणि मानाचा पहिला कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे विश्वस्त राहुल सूर्यवंशी उपस्थित होते.
हेही वाचा- “रोहित पवार हा बिनडोक माणूस”; गोपीचंद पडळकरांची टीका
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी नाकारल्याने ब्राह्मण समाजात नाराजी आहे. त्याच महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे पारडे जड असल्याने भाजपा-सेना युतीपुढील अडचणीत वाढ झाली आहे. कसबा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात ठाण मांडून आहेत.