कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघाच्या जागा बरीच वर्षे भारतीय जनता पक्षाकडे आहेत. येथील जनतेच्या विश्वासाच्या जोरावर भाजप दोन्ही जागा जिंकेल. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे वातावरण आहे.

हेही वाचा- पुणे : मुख्यमंत्री-खासदार बैठकीचा विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गाला फटका

खासदार गिरीश बापट आजारपणामुळे काही दिवसांपूर्वी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार आदींनी बापट यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वीच बापट यांना घरी सोडण्यात आले. तसेच कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळीही सुरू जाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बापट यांची अचानक भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा- “राहुल गांधींकडे मोदी साहेबांसारखी अक्कल नाही”; सुधीर मुनगंटीवारांच्या टीकेला नाना पटोलेंच प्रत्युत्तर

शिंदे म्हणाले, की दोन्ही आमदारांची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आणि सध्या आमचेच सरकार असल्याने मतदार आम्हाला साथ देतील.

Story img Loader