पुणे : साताऱ्याहून मुंबईला परत जातांना आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदणी चौकाला भेट दिली. चांदणी चौक आणि परिसरातील वाहतूक सुरळीत ठेण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबतच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. तसंच या चौकात आणि परिसरात सुरु असलेल्या पायाभूत सुविधा कामांचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी नोएडा येथे ट्विन टॉवर ही बेकायदा इमारत पाडण्यासाठी उपयोगात आणलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा… पुणे : वाहतुक कोंडीस कारणीभूत ठरणारा चांदणी चौकाजवळचा उड्डाणपूल १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान पाडणार

” पूर्वी काही झालं ते विसरून जा, उद्यापासून कामं सुरू करून पुढच्या १५ दिवसात सगळं व्यवस्थित सुरू करु, युद्धपातळीवर काम करून प्रश्न सोडवू, या उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत उद्यापासूनच १०० वाहतूक कर्मचारी येथे वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी असतील. हद्द वाद आता या चांदणी चौकात येणार नाही, सगळे शहर एकमेकांना जोडली आहेत, आधी कामं करा आणि मग हद्द बघा अशा सूचना पोलिस आणि प्रशासनाला दिल्या आहेत”,अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री यांनी यावेळी दिली.

हेही वाचा… पुणे : मेट्रो भुयारी मार्गात रूळ टाकण्याच्या कामांना वेग ; लवकरच प्रत्यक्ष चाचणी होणार

पुण्याच्या चांदणी चौकात सुरु असलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडी संदर्भातल्या समस्या स्थानिक प्रवाश्यांनी साताराला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या होत्या. स्वतः मुख्यमंत्रीही या चौकात वाहतूक कोंडीमुळे काही वेळ अडकले होते. तेव्हा या समस्येचा आढावा घेण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार परत मुंबईला जातांना या सर्व परिसराची मुख्यमंत्र्यांनी पहाणी केली.

दरम्यान पुणे शहरातील रिंगरोडच्या नियोजनाविषयी माहिती घेत यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लवकरच जिल्ह्याला पालकमंत्री देण्यात येईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यातील सत्ता परिवर्तनावर भाष्य करणाऱ्या गणेशोत्सवातील एका मंडळाच्या ‘सत्तांमथना’च्या देखाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, याकडे लक्ष वेधले असता ‘याबाबत माहिती घ्यावी लागेल’, असे शिंदे यांनी सांगितले.