मेट्रोच्या कामामुळे विस्थापित झालेल्या आणि घर मिळण्याची प्रतीक्षा असलेल्या विस्थापितांना घर मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (मंगळवार) दिले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आले होते.

पुणे : टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल; आता ‘धर्मवीर आनंद दिघे उद्यान’

पुणे विभागीय आढावा बैठक पार पडल्यानंतर शिंदे आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी निघाले. मात्र त्याचवेळी त्यांची नजर विभागीय आयुक्तालय कार्यालयाबाहेर मेट्रोच्या कामात विस्थापित होऊन आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांकडे गेली. शिंदे यांनी तत्काळ आपला ताफा थांबवून आंदोलकांची भेट घेत त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

…त्यानुसार तुमचे पुनर्वसन आपण नक्की करू –

आमच्यापैकी काही जणांना घर मिळाले आहे, मात्र आम्हाला अजून घर मिळाले नाही. आमचे सारे काही नियमानुसार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या वेळी शिंदे यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतो आणि नियमानुसार जे काही करता येईल त्यानुसार तुमचे पुनर्वसन आपण नक्की करू, असा शब्द दिला. तसेच आंदोलकांपैकी दोघांचे मोबाईल नंबर घेऊन बैठकीला बोलवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Story img Loader