महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच त्यांच्या  निरनिराळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले. त्यांनी अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये करुन महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या भावना दुखावल्या. सर्वच स्तरातून आणि विरोधी पक्षांकडून कोश्यारींबद्दल प्रचंड विरोध होत होता. त्यानंतर राष्ट्रपतींकडून त्यांना पदमुक्त करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्या विषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी थेट हात जोडून ‘गेले ते बिचारे जाऊद्या’ असे म्हणून अधिक बोलण्यास टाळले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच उद्धव ठाकरेंविषयी देखील कोश्यारींनी हे ट्रॅपमध्ये अडकले असे वक्तव्य केले होते. पुणे दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिवंगत लक्ष्मण जगताप कुटुंबियांची मध्यरात्री भेट घेतली. भेटी दरम्यान त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा आढावा घेतला आणि त्यानंतर अश्विनी जगताप या बहुमताने विजयी होतील असा विश्वासदेखील व्यक्त केला आहे. बुधवारी मुख्यमंत्री स्वतः अश्विनी जगतापांच्या प्रचारासाठी एक जाहीर सभा ही घेणार आहेत.

हेही वाचा >>> पुणे : कोणत्याही मालमत्तेवर, संपत्तीवर दावा नाही ; एकनाथ शिंदे

चिंचवड विधानसभा मतदारसंघात सध्याचे वातावरण जे आहे ते जोरदार आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि स्पिरिट हे महत्त्वाचं असतं त्यामुळे ही जागा बहुमतानं आम्ही जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात जोडत ‘ते गेले बिचारे, जाऊ द्या’ असं मिश्किल वक्तव्य केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde statement on bhagat singh koshyari pune kjp 91 ysh