पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कसब्याचा पूर्व भाग ढवळून निघणार आहे. भाजपा-शिंदे गट युतीचे उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पूर्व भागातील दुचाकी फेरीला समता भूमी येथून प्रारंभ झाला आहे. कसब्यातील लाल महाल येथे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची दुपारी समारोपाची सभा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतल्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला अधिक जोर आला आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम कसब्यात फेरी काढली होती. फडणवीस यांनी भाजपाचा परंपरागत मतदार असलेल्या नारायण पेठ, शनिवार पेठ आणि सदाशिव पेठ या प्रमुख पेठांमधून सायंकाळी फेरी काढली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्व भाग ढवळून काढणार आहेत. शिवाजी रस्त्याच्या पलीकडच्या भागात म्हणजे पूर्व कसब्यात मुख्यमंत्र्यांची रॅली आयोजित करण्यात आली आहे. या भागात प्रामुख्याने बहुजन समाजाचा मतदार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप-शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित या फेरीला प्रारंभ झाला.

प्रचारफेरीचा मार्ग –

पालखी विठोबा चौक, हमाल तालीम, हिंदमाता चौक, साखळीपीर तालीम,सरळ डोके तालीम, लक्ष्मी रस्ता, अल्पना चित्रपटगृह, कस्तुरे चौक, मोमीनपुरा, शीतलादेवी चौक, फडगेट पोलीस चौक, सेवा मित्र मंडळ,अकरा मारुती मंडळ, चिमण्या गणपती, नागनाथ पार, शगुन चौक, तांबडी जोगेश्वरी, बुधवार चौक, मोती चौक, फडके हौद चौक मार्गे लालमहाल येथे प्रचारफेरीचा समारोप होणार आहे.