पुणे : भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मंगळवारी, एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी वाटेगाव (जि. सांगली) येथे येणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली.
अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी के. चंद्रशेखर राव मंगळवारी, एक ऑगस्ट रोजी वाटेगावात येणार आहेत. साखराळे येथे शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी राव चर्चा करणार असून, राज्यभरातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आंमत्रित करण्यात आले आहे. शेतकरी संघटनेने शनिवारी, २९ जुलै रोजी हैदराबाद येथे राव यांची भेट घेऊन जयंतीनिमित्त अभिवादनासाठी वाटेगावात येण्याचे निमंत्रण दिले होते.