भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या हल्ल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलच तापताना दिसत आहे. या घटनेवरून भाजपा विरुद्ध शिवसेनेतील वादांमध्ये आणखी एका नव्या वादाची भर पडली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी किरीट सोमय्या आज पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन एफआयआर नोंदवण्यासाठी गेले होते, मात्र पोलिसांकडून एफआयआर नोंदवला गेला नसल्याचे सांगत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार गिरीश बापट, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि मोठ्यासंख्येने भाजपा पदाधिकरी, कार्यकर्ते होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रसंगी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “दुर्दैवाची बाब आहे की पोलीस आयुक्त अमिताभा गुप्ता यांचा या स्थानिक पोलीस स्टेशनवर एवढा दबाव आहे आणि मुख्यमंत्री कार्यालायाची पोलीस आयुक्तांना सूचना आहे की, किरीट सोमय्या यांचा एफआयआर नोंदवायचा नाही. सीआयएसएफ कमांडोंनी देखील तक्रार दिली तर त्यांचीही एफआयआर घेतली नाही. म्हणजे पुणे पोलीस ठाकरे सरकारचे नाही तर ठाकरे परिवाराचे पोलीस असल्यासारखं वागत आहे. दोन तास आम्हाला मूर्ख बनवलं, आमचा जवाब घेतला. एफआयआर घेतोय… सात दिवस झाले आजपर्यंत, ६४ लोकानी हल्ला केला त्यांना चार दिवसांपूर्वी सगळे पुरावे दिले. परंतु एकालाही अटक केलेली नाही. पहिल्या दिवशीचे आठ-लोक सोडून काहीही नाही. आता मला शंका येतेय की हे पोलीस स्टेशन देखील या कटात सहभागी होते.”

“….मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे”, गिरीश बापट यांचं पुण्यात विधान

तसेच, “पुरावे दिले की ज्यावेळी शिवसेनेच्या गुंडाने एवढा मोठा दगड मारला, त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सोबत होती तिची तक्रार तिचा जवाब देखील घेतला नाही. केवळ एवढच नाही जे पुणे महापालिकेने सीसीटीव्ही फुटेज दिलं. त्यात शिवसेनेचे गुंड काठ्यांनी कमांडोंजवर हल्ला करत आहेत, हे दिसतय. त्याची देखील पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दखल घेतली नाही.” असं सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.

“मला मारहाण केल्याप्रकरणी शहराध्यक्षासह ‘या’ ८ शिवसेना नेत्यांना अटक होणार”, किरीट सोमय्यांचं ट्वीट

याचबरोबर, “एवढच नाही माझ्या गाडी समोर ते थांबले, झोपले आणि त्यावेळी कमांडो त्यांना हलवायचा प्रयत्न करत होते. त्यावेळ त्या कमांडोवर शिवसैनिकांनी हल्ला केला. म्हणून उद्धव ठाकरे पुणे पोलिसांचा माफियासाराखा उपयोग करत आहेत. हे आम्ही सहन करणार नाही. या सगळ्यांवर किरीट सोमय्यांविरोधात कट रचल्याचा गुन्हा, कमांडोवर हल्ला करण्याचा गुन्हा हे सेक्शन यांना लावावेच लागणार.” असंही किरीट सोमय्या यांनी बोलून दाखवलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister uddhav thackeray is using pune police like a mafia kirit somaiyas allegation msr 87 svk
Show comments