पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कसबा मतदार संघातील व्यापारी, गणेश मंडळ आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेणार आहे. फडके हौद येथील गुजराती हायस्कूल येथे ४ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच २४ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो होण्याची शक्यता असल्याची माहिती माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.
हेही वाचा- “कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपा पराभूत होणार, हे अमित शाहांनी हेरलं”, रोहित पवारांचा टोला!
शिवसेना आणि भाजपा एकत्रित राज्य सरकार असून राज्यभरात चांगल काम सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या भागात जात आहेत. त्या ठिकाणी नागरिक जोरदार स्वागत करीत असून आता आम्हाला शिवसेना चिन्ह मिळाले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचेही म्हस्के म्हणाले.
हेही वाचा- पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून ‘शिवसृष्टी’तील सरकारवाड्याची पाहणी
कसबा पोटनिवडणुकीनंतर पुणे शिवसेना भवन कार्यालयाचे उदघाटन होणार
पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी सारसबाग परिसरात भव्य शिवसेनाभवन उभारण्यात आले आहे. या शिवसेना भवनचे उदघाटन कसबा विधानसभा पोटनिवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी दिली.