शिरुर : शिरुर शहरास उद्या गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ पासून दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे . पाटील यांनी सांगितले की शिरुर शहरास पाणी पुरवठा करणेसाठीच्या कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-यातील पाणीसाठा अत्यंत कमी प्रमाणात शिल्लक राहिलेला आहे. कुकडी पाटबंधारे विभागाकडे कोल्हापूर बंधारा पूर्ण क्षमतेने भरून घेण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.

सद्य परिस्थितीमध्ये बंधा-यात उपलब्ध असणारा पाणीसाठा काटकसर करुन वापरणे आवश्यक आहे.या परिस्थितीमध्ये उपाययोजना म्हणून गुरुवार दि. २० मार्च पासून शिरुर नगरपरिषदेच्या नळ पाणीपुरवठा योजनेतुन शहरास एक दिवसाआड पुरवठा केला जाणार आहे. म्हणजेच गुरुवारी दि . २० मार्च पासून पाणीपुरवठा बंद राहील व शुक्रवारी दि . २१ मार्च रोजी पाणी पुरवठा नियमित होईल.

नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा. तसेच ज्या नळ कनेक्शन धारकांनी नळाला तोट्या लावलेल्या नाहीत, त्यांनी नळाला तोट्या बसवुन घ्याव्यात व पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच नळ कनेक्शनला वीज मोटार लावून जास्तीचा पाणीसाठा करु नये. वीजपुरवठा खंडीत झाल्यास अथवा तांत्रिक बिघाड झाल्यास पाणीपुरवठ्याच्या नियमित वेळापत्रकात आवश्यकतेनुसार बदल करणेत येईल असे ही पाटील यांनी सांगितले .

Story img Loader