शौचालयास बसलेल्या अडीच वर्षांच्या बालकाला भरधाव मोटारीने धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मार्केटयार्ड येथील कुमारपार्कच्या जवळ गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मोटार चालकास अटक करण्यात आली आहे.
आदित्य काळुराम गायकवाड (वय- अडीच वर्षे, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केटयार्ड) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी योगेश वैजुनाथ जाधव (वय २४, रा. टिंबर मार्केट, भवानी पेठ) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड येथील प्रेमनगर वसाहतीच्या बाजूला असलेल्या कुमारपार्कजळ आदित्य हा शौचालयास बसला होता. त्यावेळी जाधव हा मोटार भरधाव वेगाने घेऊन जात असताना त्याची आदित्यला जोराची धकड बसली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जाधव हा पळून गेला होता. त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आर. पी. कांबळे अधिक तपास करत आहेत.

Story img Loader