पिंपरीतील कॅम्प परिसरात काही दिवसांपूर्वी अनेक दुकानांची अनधिकृत होर्डिंग महापालिकेने काढून टाकली होती. त्यावेळी काही तरुणांनी त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर या दुकानाची होर्डिंग चिनी मालाचा बहिष्कार म्हणून काढली असल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. याचा मनस्ताप येथील दुकानदारांना झाला आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. त्यामुळे व्हाट्सअॅपवर काही मेसेज फिरत आहेत. यात चिनी वस्तूचा वापर करू नका, असा संदेश देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरीमधील कॅम्प परिसरात महापालिकेने दुकानावरील होर्डिंग हटवली. त्यावेळी काही तरुणांनी एक व्हिडिओ काढला. चीनमधील मोबाईल कंपन्यांची जाहिरात पिंपरीमध्ये करू नये, असा व्हिडिओ सध्या व्हॉटसअॅपच्या माध्यमातून फिरतो आहे. या व्हिडिओमधील सत्यता पडताळून पाहण्यासाठी कॅम्प परिसरातील विक्रेत्यांशी संपर्क साधल्यानंतर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत तथ्य नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेचा जाहिरात कर न भरल्याने पालिकेने संबंधित होर्डिंग्जवर कारवाई केली होती, अशी माहिती या परिसरातील विक्रेत्यांनी दिली. चीनचा माल इकडे विकला जातो. ग्राहक तो माल घेतात त्यामुळे तो व्हिडिओ चुकीचा आहे. दावा दुकानदारांनी केला आहे.

पिंपरीच्या कॅम्प परिसरात अनेक चायनीज वस्तूची विक्री करणारी दुकाने आहेत. या सर्व विक्रेत्यांना महापालिकेचा जाहिरात कर थकवला होता. त्यासाठी त्यांना वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी तो कर न भरल्याने १५० दुकानांपैकी १२० दुकानांवर महापालिकेने कारवाई केली. जो व्हिडीओ सध्या फिरतो आहे. तो चुकीचा असल्याच्या वृत्ताला पालिका अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
व्हॉटसअॅप व्हिडिओची कोणतीही शहानिशा न करता व्हिडीओ पुढे पाठवले जातात. तसाच एक व्हिडिओ पिंपरीतील कॅम्प परिसरातील व्हायरल झाला असून तो चुकीचा आहे.