पिंपरीतील कॅम्प परिसरात काही दिवसांपूर्वी अनेक दुकानांची अनधिकृत होर्डिंग महापालिकेने काढून टाकली होती. त्यावेळी काही तरुणांनी त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर या दुकानाची होर्डिंग चिनी मालाचा बहिष्कार म्हणून काढली असल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. याचा मनस्ताप येथील दुकानदारांना झाला आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. त्यामुळे व्हाट्सअॅपवर काही मेसेज फिरत आहेत. यात चिनी वस्तूचा वापर करू नका, असा संदेश देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरीमधील कॅम्प परिसरात महापालिकेने दुकानावरील होर्डिंग हटवली. त्यावेळी काही तरुणांनी एक व्हिडिओ काढला. चीनमधील मोबाईल कंपन्यांची जाहिरात पिंपरीमध्ये करू नये, असा व्हिडिओ सध्या व्हॉटसअॅपच्या माध्यमातून फिरतो आहे. या व्हिडिओमधील सत्यता पडताळून पाहण्यासाठी कॅम्प परिसरातील विक्रेत्यांशी संपर्क साधल्यानंतर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत तथ्य नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेचा जाहिरात कर न भरल्याने पालिकेने संबंधित होर्डिंग्जवर कारवाई केली होती, अशी माहिती या परिसरातील विक्रेत्यांनी दिली. चीनचा माल इकडे विकला जातो. ग्राहक तो माल घेतात त्यामुळे तो व्हिडिओ चुकीचा आहे. दावा दुकानदारांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा