चिंचवड मधून नाना काटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत केलं जोरदार शक्ती प्रदर्शन

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाना काटे यांनी बंडखोरी करत जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात दर्शन घेऊन नाना काटे यांच्या रॅलीची सुरवात झाली. यावेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, विनोद नढे, संतोष कोकणे,  उषा माई काळे, हरिभाऊ तिकोणे, खंडुशेठ कोकणे, शिरीष साठे, शेखर चद्रंकात काटे, शाम जगताप सचिन काळे, तानाजी जवळकर, नवनाथ नढे, चद्रकांत तापकीर, बापु कातळे, विष्णु शेळके, सागर कोकणे, संगिता कोकणे, प्रशांत सपकाळ, सुमित डोळस, काळुराम कवितके यांच्यासह अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अशा’ होणार लढती; शिवसेनेच्या (ठाकरे) पदरी निराशा

जनता आपल्या सोबत असल्याने ही लढाई आपल्यासाठी अवघड नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल कलाटे आणि महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचं आव्हान आपण मानत नसल्याचेही काटे माध्यमांशी बोलताना सांगितलं. काटे म्हणाले की, चिंचवडची जागा ज्यांचं डीपोझिट जप्त झालं होतं अशा उमेदवाराला दिली आहे. चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी मी मैदानात उतरलो आहे. महायुतीचे तिकीट जाहीर झाल्यावर मी महाविकास आघाडीकडे तिकीट मागितलं होत. पण वरिष्ठ नेत्यांना अंधारात ठेऊन इतर नेत्यांनी कलाटे यांना तिकीट दिल. पाठीमाग च्या निवडणुकीत माझ्यासोबत एक लाख मतदान होत. यावेळी या एक लाख मतदानासह अनेक नागरिक माझ्यासोबत आहेत. हा माझा विश्वास आहे. याच मतदारांनी दाखवलेल्या विश्वासावर मी ही निवडणूक जिंकेल. असा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinchwad assembly constituency ajit pawar ncp leader nana kate filing nomination as a independent candidate for maharashtra assembly election 2024 kjp 91 zws