चिंचवड विधानसभेवरून भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. असं असताना आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील चिंचवड विधानसभेवर दावा केला आहे. त्याचबरोबर दिर आणि भावजय यांच्यात सुरू असलेल्या वादावर भाष्य करत शंकर जगताप आणि विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना शरद पवार गटाची दारे खुली असल्याची अप्रत्यक्षरीत्या ऑफर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली आहे.

हेही वाचा – पुणे: बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान चौक परिसरात उद्या वाहतूक बदल

Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bjp leader vinod tawde reply to sharad pawar for targeting amit shah
अमित शहा देशभक्तीच्या प्रकरणात तडीपार; विनोद तावडे यांचे शरद पवार यांना प्रत्युत्तर
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…

हेही वाचा – चिंचवड विधानसभा : अश्विनी जगताप, शंकर जगताप पाठोपाठ चंद्रकांत नखाते भाजपमधून इच्छुक; घराणेशाहीला केला विरोध

चिंचवड विधानसभेवरून महायुतीत कलगीतुरा रंगलेला असताना महाविकास आघाडीत देखील चिंचवडवरून धुसफूस सुरू झाली आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी चिंचवड विधानसभेवर दावा केला आहे. पिंपरी, चिंचवड विधानसभा ही तुतारी चिन्हावरच लढवली जाणार आहे. दोन्ही विधानसभेवर शरद पवार यांची ताकद आहे. २००९ ते आजतागायत इतिहास पाहिल्यानंतर या मतदारसंघावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मानणारा मतदार असल्याचे मत तुषार कामठे यांनी व्यक्त केल आहे. दरम्यान, कामठे यांनी जगताप कुटुंबीयांवर भाष्य करत अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांसाठी आमच्या पक्षाची दारे नेहमीच खुली असतील असं म्हणत कामठे यांनी शंकर जगताप आणि विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. शंकर जगताप आणि अश्विनी लक्ष्मण जगताप या दोघांपैकी एकाला भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर दुसरा व्यक्ती काय निर्णय घेणार आणि तो कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन लढणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Story img Loader