पुणे : चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होताच पिंपरी- चिंचवड शहरात राजकारण रंगयला सुरुवात झाली आहे. ‘राजा का बेटा राजा नही बनेगा. राजा वही बनेगा जो काबील होगा!’ अशी सूचक आणि बोलकी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्यामुळे, ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी निवडणूक लढवली होती. तर, २०१९ ला शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी नशीब अजमावले होते. परंतु, या दोघांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. आता पुन्हा एकदा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी शड्डू ठोकला असून ते तयारी लागले आहेत.

हेही वाचा – पणे : वायदेबंदी विरोधात सेबीसमोरील आंदोलनासाठी शेतकरी संघटनांची एकजूट, २३ जानेवारी रोजी मुंबईत धरणे

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे तीन जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली असून, आता विरोधकांनी देखील या पोटनिवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो काबील होगा! अशी सूचक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जगताप यांच्या कुटुंबीयातून लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तशी प्रतिक्रिया त्यांनी लोकसत्ता ऑनलाइनला दिली असून शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – पुणे : मूल होण्यासाठी पत्नीला पाजली स्मशानातील राख, भरभराटीसाठी मृतांच्या हाडाची पावडर

सध्या तरी मी निवडणुकीच्या तयारी लागलो आहे, असे काटे म्हणाले आहेत. यावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी देखील भाष्य केले असून आम्ही तयारीला लागलो आहोत. असे सूचक भाष्य त्यांनी केले आहे. त्यामुळे, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत, तशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात आहे.

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपाने उमेदवारी दिल्यास बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे, असे देखील बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार आणि कोणाला उमेदवारी देणार यावर देखील बरेच राजकीय गणिते अवलंबून आहेत.