एकीकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा मोठा फटका बसला असताना चिंचवडमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळालं आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपानं पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे निवडणूक पार पडली. शिवाय, उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी झाल्यामुळे ही तिरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये अश्विनी जगताप यांचा ३६, ०९१ मतांनी मोठा विजय झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

“मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देते. अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामं आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे”, अशी प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी विजयानंत दिली आहे.

Sagar Meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss
‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
Surganas backward image will change says Dhananjay Munde
सुरगाण्याची अतिमागास प्रतिमा बदलणार, धनंजय मुंडे यांचे आश्वासन
Uddhav Thackeray Buldhana, Buldhana meeting,
जिथून गद्दार आसामकडे पळाले त्या सुरतसह महाराष्ट्रात शिवरायांची मंदिरे उभारणार, बुलढाण्याच्या सभेत उद्धव ठाकरे गरजले
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट
13 ex corporators left bjp in the pimpri chinchwad
पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर
Deepak Kesarkar challenge increased due to rebellion from BJP
लक्षवेधी लढत: सावंतवाडी : बंडखोरीमुळे केसरकरांच्या आव्हानात वाढ

अंतिम आकडेवारी…

अश्विनी जगताप – १, ३५, ४३४
नाना काटे – ९९, ३४३
राहुल कलाटे – ४४, ०८२

Video: कसबा, चिंचवड निकालांचा भाजपासाठी नेमका अर्थ काय? जाणून घ्या गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

चिंचवडमध्ये काय होती राजकीय समीकरणं?

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पोटनिवडणुका लागल्या. यासाठी भाजपाकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाकडून मागणी करण्यात आली. राजकीय वर्तुळात त्यासंदर्भात मोठी चर्चाही सुरू झाली होती. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडल्यानंतर कुणाला उमेदवारी द्यावी, याचा विचार सुरू झाला. बऱ्याच प्रतीक्षेनंतर नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

राहुल कलाटेंची बंडखोरी

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधून निवडणूक लढण्यासाठी राहुल कलाटे इच्छुक होते. पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर अजित पवार, सचिन अहिर अशा नेतेमंडळींनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही राहुल कलाटे निवडणूक लढण्यावर ठाम राहिले.

Kasba Chinchwad Bypoll Election Result: राहुल कलाटेंनी चिंचवडमध्ये मविआची मतं घेतली? बावनकुळे म्हणतात, “त्यांनी फक्त…!”

मतमोजणी आणि मतदारांचा कौल

अखेर आज झालेल्या मतमोजणीमध्ये पिंपरी-चिंचवडकरांनी अश्विनी जगताप यांच्या पारड्यात आपला कौल दिल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, महाविकास आघाडीकडून नाना काटे आणि राहुल कलाटेंना मिळालेल्या मतांचं गणित मांडून हा विजय मविआचा असू शकला असता, असा दावा केला जात आहे. राहुल कलाटे आणि नाना काटे यांना मिळालेल्या मतांची बेरीज ही अश्विनी जगताप यांच्याकडे असलेल्या मतांच्या आघाडीपेक्षा जास्त असल्यामुळे जर कलाटेंनी बंडखोरी केली नसती, तर चिंचवडमध्येही भाजपाला धक्का देण्यात मविआला यश आलं असतं, असा तर्क मांडला जात आहे.