चिंचवड देवस्थान ट्रस्ट, चिंचवड ग्रामस्थ आणि पिंपरी पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १४ डिसेंबर या दरम्यान श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव होणार आहे. महोत्सवादरम्यान विविध धार्मिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यानिमित्ताने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पुणे : मोफत साडी वाटपाच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने लंपास

चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी  गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. माजी नगरसेवक अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर शेडगे यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी १० डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पालिका आयुक्त शेखर सिंह, धर्मदाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के, खासदार श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, उमा खापरे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित राहणार आहेत. चिंचवड मोरया मंदिराच्या प्रांगणात १३ डिसेंबरला सायंकाळी ६ ते ८ दरम्यान जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. तर, महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी १४ डिसेंबरला दुपारी १२ पासून महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

Story img Loader