पिंपरी- चिंचवडमध्ये लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. चिंचवडमधील दवाबाजार येथे सहा वर्षांच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली असून चॉकलेटचे आमिष दाखवून नराधम तिला घरी जायचा. या प्रकरणी निगडी पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिंचवडच्या दवाबाजार परिसरातील सोसायटीत राहणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीवर मोहसीन शेख या नराधमाने बलात्कार केल्याचे समोर आले. २९ सप्टेंबरपूर्वी दोन ते तीन महिन्यांपासून हा प्रकार घडत होता. चॉकलेटचे आमिष दाखवून हा नराधम त्याच्या घरात मुलीला घेऊन जायचा आणि त्या मुलीवर बलात्कार करायचा. हा प्रकार मंगळवारी रात्री उघड झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी रात्री उघड झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

पिंपरी- चिंचवडमध्ये लहान मुलीवरील बलात्काराची गेल्या २४ तासांमधील दुसरी घटना आहे. यापूर्वी पिंपरीतील नागसेन झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलीला मंगळवारी संध्याकाळी एका नराधमाने भूताची भीती दाखवत निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणातील नराधमाला अटक करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinchwad rape on 6 year old girl in dawa bazar
Show comments