भाजपाच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप या शरद पवार गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर या चर्चेला अश्विनी जगताप यांनी पूर्णविराम दिला आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. शरद पवार यांची मी भेट घेतलेली नाही. कुणीतरी मुद्दामहून अशा बातम्या पसरवत असल्याचा आरोप अश्विनी जगताप यांनी केला. त्या पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या, माझ्या विरोधात कुणीतरी चुकीच्या बातम्या पसरवत आहे. मी शरद पवार यांना भेटलेले नाही. त्यांच्या पक्षात प्रवेश करणार नाही. आम्ही सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी निष्ठा काय असते हे आजारपणात दाखवून दिलेले आहे. त्यामुळे मी पक्ष सोडणार या सर्व गोष्टी निरर्थक आहेत. पुढे त्या म्हणाल्या, आमच्या कुटुंबात कुठलाही वाद नाही. त्यामुळे पक्ष ज्याला उमेदवारी देईल मी त्याचं काम करेल.

हेही वाचा – दारु पिताना झालेल्या वादातून मेहुण्याला भोसकले, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास अटक

हेही वाचा – ‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड – बोंडें’वर गुन्हे दाखल करा; काँग्रेस ची मागणी

अनेक जण आम्हाला सोडून जात असले तरी आमच्यात कुठलीही गटबाजी नाही. निष्ठावंत कार्यकर्ता आमच्या सोबत असल्याचे मत देखील अश्विनी जगताप यांनी व्यक्त केल. नाना काटे यांनी चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं असलं तरी पक्षश्रेष्ठी यावर निर्णय घेईल. काटे यांचं आव्हान असेल असे मला वाटत नाही, असं देखील अश्विनी जगताप यांनी अधोरेखित केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinchwad will ashwini jagtap join sharad pawar group what did she say kjp 91 ssb