पिंपरी- चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना टळली आहे. शहरातील कासारवाडी येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने पोहण्यासाठी आलेल्या व्यक्तींना श्वास घेण्याचा त्रास झाला. काहीजण बेशुद्ध झाल्याची माहिती समोर येत आहे. पोहण्यासाठी २२ जण आले होते. पैकी, ११ जणांना त्रास झाल्याने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आलं आहे. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी- चिंचवड शहरातील कासारवाडीत मोठी दुर्घटना टळली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात सकाळी क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला. परिस्थिती अत्यंत भीषण होती. घटनास्थळी काहीजण बेशुद्ध झाल्याची माहिती देखील मिळत आहे.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवड पोलीस ॲक्शन मोडमध्ये; ‘त्या’ नऊ स्फोटांप्रकरणी चार पोलीस निलंबित, दोन अधिकाऱ्यांचा समावेश

परिसरात ५०० मीटर पर्यंत क्लोरीन गॅस पसरला होता. त्यामुळे जलतरण तलावाच्या समोरून जाणारा रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल पोहोचलेलं आहे. सकाळच्या बॅचला २० ते २२ जण पोहण्यासाठी आले होते. पैकी ११ जणांना त्रास झाल्याने त्यांना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा हलगर्जीपणा समोर आलेला आहे. या घटने प्रकरण महानगरपालिका कोणावर कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chlorine gas leakage in swimming pool at kasarwadi of pimpri chinchwad municipal corporation kjp 91 mrj