कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी) परीक्षांचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. त्यात दहावीचा निकाल ९८.९४ टक्के, तर बारावीचा निकाल ९६.९३ टक्के लागला. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पश्चिम विभागाचा दहावीचा निकाल ९९.८१ टक्के, बारावीचा निकाल ९८.३४ टक्के लागला. दहावी आणि बारावीच्या निकालात पहिला क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील विद्यार्थ्यांचा समावेश असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात घट झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>> पुणे: टोळक्याकडून किराणा माल दुकानाची तोडफोड; दाम्पत्याला मारहाण

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
Students selected for regional finals said Loksatta Lokankika competition is different from others
लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीला उत्साहात सुरुवात, सहभागी विद्यार्थी म्हणतात…
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल

सीआयएससीईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. एकूण दोन लाख ३७ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी दोन लाख ३५ हजार ११४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात एक लाख २६ हजार ४७४ मुले, एक लाख आठ हजार ६४० मुली आहेत. बारावीची परीक्षा ९८ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी दिली. त्यांतील ९५ हजार ४८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ४९ हजार ६८७ मुले आणि ४५ हजार ७९६ मुली आहेत. दोन्ही परीक्षांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. दहावीचा निकाल मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अर्ध्या टक्क्याने, तर बारावीच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २.१४ टक्क्यांनी जास्त आहे.

हेही वाचा >>> प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्या; पुणे-इंदूर दरम्यान विशेष गाडी

गेल्या वर्षी दहावीचा निकाल ९९.९७ टक्के, तर बारावीचा ९९.३८ टक्के लागला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल १.०३ टक्क्यांनी, तर बारावीचा निकाल २.४५ टक्क्यांनी घटला आहे. विभागनिहाय निकालामध्ये दहावीच्या निकालात पश्चिम विभागाने ९९.८१ टक्क्यांसह देशात अग्रस्थान मिळवले. तर बारावीच्या निकालात ९९.२० टक्क्यांसह दक्षिण विभागाने बाजी मारल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील गुणवंत

दहावीच्या परीक्षेत ९९.८ टक्के गुणांसह पहिला क्रमांक मिळवणाऱ्या देशातील नऊ विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी राज्यातील आहेत. त्यात मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये श्रेया उपाध्याय, कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलमधील तनय शाह, चॅम्पियन स्कूलमधील अद्वय सरदेसाई, मालाडच्या चिल्ड्रन्स ॲकॅडमीतील हिया संघवी, ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमधील यश भसीन यांचा समावेश आहे. बारावीच्या परीक्षेत ९९.७५ टक्के गुणांसह देशात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या पाच विद्यार्थ्यांमध्ये ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमधील इप्सिता भट्टाचार्यचा समावेश आहे.

पुनर्मूल्यांकन सुविधा उपलब्ध

गुणांच्या पुनर्मूल्यांकनाची सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. त्यानुसार ही सुविधा २१ मेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. अधिक माहिती http://www.cisce.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Story img Loader