पुणे : ‘गंभीर गुन्हा घडल्यानंतर आरोपीला कठोर शिक्षा करण्याची, तसेच द्रुतगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी केली जाते. न्यायाधीशांची अपुरी संख्या, पायभूत सुविधा, पोलीस दलातील मनुष्यबळ याविषयी मात्र फारसे भाष्य केले जात नाही. किंबहुना न्यायप्रणालीत सुधारणेसाठी नागरिक रस्त्यावर उतरत नाहीत,’ असे स्पष्ट मत निवृत्त पोलीस महासंचालक मीरा चढ्ढा-बोरवणकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनकडून (अमेरिका) साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम), साधना ट्रस्ट पुरस्कार प्रदान सोहळ्याचे संयाेजक होते. ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘दिलीप चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार’, तसेच ओडिशातील चेटकीण प्रथा आणि अंधश्रद्धेविरोधात लढा देणारे देबेंद्र सुतार यांना ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ बोरवणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ‘धरणसूक्त’ कादंबरीचे लेखक विलास शेळके यांना ललित ग्रंथ पुरस्कार, ‘माणूस असं का वागतो?’ पुस्तकाच्या लेखिका अंजली चिपलकट्टी यांना वैचारिक ग्रंथ पुरस्कार, ‘रंगवाचा’चे संपादक वामन पंडित यांना रा. शं. दातार नाट्य पुरस्कार, शिक्षण चळवळीतील कार्याबद्दल डॉ. शरद जावडेकर यांना विशेष पुरस्कार, सामाजिक कार्यकर्त्या हसीना खान यांना सामाजिक कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते रूपेश पाटकर यांना सामाजिक कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार आदी पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार निवड समितीच्या समन्वयक शोभा चित्रे, ‘मासूम’च्या सहसमन्वयक मनीषा गुप्ते, साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाठ या वेळी उपस्थित होते.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Due to low response to half marathon police are forced to fill 300 applications and focus on ticket sales affecting law and order
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सोडून नागपुरातील ठाणेदार विकतायेत तिकीट…. प्रत्येकाला तीनशे…
Police beaten in Nigdi Three arrested
पुणे : निगडीत पोलिसांना मारहाण; तिघे अटकेत
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Forest Minister Ganesh Naik was upset with officials response and warn to forest officials
अधिकाऱ्यांच्या उत्तराने वनमंत्री नाराज, वनाधिकाऱ्यांना दिली तंबी…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?

हेही वाचा – पुणे : नारायणगाव अपघात प्रकरणातील पसार टेम्पोचालक गजाआड, एसटी बसचालकही अटकेत

बोरवणकर म्हणाल्या, ‘सैफ अली खान याच्यावर मुंबईत हल्ला झाला. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी माझ्याशी संपर्क साधला. हल्ला प्रकरणात माझी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर प्रसारमाध्यमे त्याची दखल घेतात. नागरिकही आवाज उठवतात. मात्र, न्यायप्रणालीत (जस्टीस सिस्टीम) बदल करण्यासाठी कोणीच आवाज उठवत नाही. द्रुतगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली जाते. न्यायाधीशांची अपुरी संख्या, पायाभूत सुविधा, अपुरे पोलीस मनुष्यबळाविषयी कोणी भाष्य करत नाही.’

‘चार्वाकाने भारतीय समाजाला चिकित्सेचे सूत्र सांगितले. आजमितीला समाजमाध्यमात प्रसारित होणारे संदेश, माहितीची सत्यता पडताळली जात नाही. नव्या पिढीने चिकित्सा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा,’ असे आवाहन डाॅ. साळुंखे यांनी केले. ‘ओडिशात गेल्या दहा वर्षांत चेटकीण ठरवून ६०० महिलांचे खून करण्यात आले,’ असे सांगून सुतार म्हणाले, ‘डाॅ. नरेंद्र दाभोलकर देशभरातील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आहे. ओडिशातही अंधश्रद्धेविरोधात लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी डाॅ. दाभोलकर पुरस्कार देण्यात येईल.’ शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. रमेश अवस्थी यांनी आभार मानले.

हेही वाचा – पिंपरी : सावकारी जाचाला कंटाळून कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; आई-मुलाचा मृत्यू, वडील बचावले

‘बीपीओ‘तील खून प्रकरणावर परखड भाष्य

‘पुण्यातील एका बीपीओच्या आवारात कर्मचारी तरुणीचा सहकाऱ्याने शस्त्राने वार करून खून केला. कंपनीच्या आवरात ही घटना घडली. तिच्या मदतीसाठी कोणी धावले नाही. गंभीर गुन्ह्यात साक्ष देण्यास नागरिक कचरतात. काही जण न्यायालयीन खटल्याची सुनावणी सुरू असताना साक्ष फिरवतात. सुनावणीसाठी उपस्थित राहत नाहीत. नागरिक पोलिसांना मदत करत नाहीत. गुन्हा घडताना बघ्याची भूमिका घेणे किंवा पोलिसांना मदत न करणे, म्हणजे समाजाचा पराभव आहे,’ असे स्पष्ट मत मीरा चढ्ढा-बोरवणकर यांनी व्यक्त केले. ‘चिंचवडमधील एका महाविद्यालयीन तरुणीच्या खून प्रकरणात तिच्या मित्र-मैत्रिणींनी आणि घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्याने दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. बचाव पक्षाच्या वकिलांच्या उलटतपासणीत ते खंबीर राहिले. त्यांच्या साक्षीमुळे आरोपी तरुणाला जन्मठेपेची शिक्षा झाली,’ असेही त्यांनी नमूद केले.

Story img Loader