लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे: महापालिकेच्या शहरी-गरीब योजनेतील उत्पन्नाच्या अटीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी घेतला आहे. वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र यात सुधारणा करत वार्षिक उत्पन्न एक लाख ६० हजार रुपये पर्यंत करण्यात आले आहे. तसा प्रस्ताव सादर करण्याची सूचना आयुक्त विक्रम कुमार यांनी आरोग्य विभागाला केली आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
महापालिकेची शहरी-गरीब योजना अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे. सन २०१० पासून महापालिकेने ‘शहरी गरीब आरोग्य योजना’ सुरू केली. त्या अंतर्गत दरवर्षी पात्र लाभार्थ्यांना कार्ड दिले जाते. कर्करोग, हृदयरोग, किडनीचे आजार यासाठी २ लाख रुपयांपर्यंत मदत केली जाते. तर इतर उपचारांसाठी देयकाच्या ५० टक्के मदत केली जाते, त्यासाठीही एक लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
आणखी वाचा- पुणे: शहर पुन्हा खड्ड्यात? ३२८ किलोमीटर लांबीचे रस्ते खोदण्याच्या प्रस्तावांना मंजुरी
ही योजना सुरू झाल्यापासून उत्पन्नाची मर्यादा ही एक लाख रुपये असल्याने त्यापेक्षा थोडे जास्त उत्पन्न असलेल्या नागरिकांना योजनेचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये वाढ करावी, अशी मागणी होत होती. त्यातच आयुक्तांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभासाठी उत्पन्नाची मर्यादा १ लाख ६० हजार केल्यानंतर या मागणीने जोर धरला होता. त्यानुसार शहरी गरीब योजनेसाठी १ लाख ६० हजार रुपयांची उत्पन्नाची अट ठेवण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव सादर करण्याची सूचना आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी आरोग्य विभागाला केली आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी होईल.