“राजकारणावर माझा अजिबात विश्वास नाही. सरकारे येतात आणि जातात, देशाची अवस्था मात्र तीच राहते. ज्या देशाच्या कायदेमंडळातील एक तृतीयांश लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, त्या देशाने कोणती आशा बाळगावी! चारित्र्यसंपन्न स्त्री-पुरुष हीच आपल्या देशाची खरी गरज आहे,” असे मत जे. पी. वासवानी यांनी व्यक्त केले.
साधू वासवानी मिशनतर्फे जे. पी. वासवानी यांच्या 95 व्या वाढदिवसानिमित्त रविवारी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा आणि अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत ‘रूबरू रोशनी’ या गप्पांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमिर खानने वासवानी आणि दलाई लामा यांची मुलाखत घेतली.
जे. पी. वासवानी म्हणाले, “देशाची परिस्थिती बदलण्याची इच्छा असेल तर शाळा, महाविद्यालये आणि घर या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करायला हवे. कोणत्याही विशिष्ट धर्मालाच अधिक महत्त्व देणे चुकीचे आहे. पण आता आपण निधर्मीपणाच्या नावाखाली शिक्षण संस्थांमधून ‘देव’ या संकल्पनेला हद्दपार केले आहे. त्यामुळे काहीही करताना ‘देव पाहतोय’ ही भीती राहिलेली नाही. देवाला जीवनात परत आणणे आवश्यक आहे.”
प्रेम आणि दया यातूनच आनंद मिळतो असे सांगून दलाई लामा म्हणाले, “प्रत्येकाने आराम करतेवेळी स्वत:च्या मनात खोलवर डोकावून पाहिले पाहिजे. स्वत:चा असा शोध घेणे मनुष्यासाठी आरोग्यदायी ठरते.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा