शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी बंद सदनिकांचे कुलुप तोडून रोकड तसेच दागिने असा ऐवज लांबविला.दत्तवाडी भागातील लक्ष्मीनगर सोसायटीतील रहिवासी महादेव वसंत भोसले (वय ४२) यांच्या सदनिकेचे कुलुप चोरट्यांनी तोडले. कपाटातील रोकड, दाागिने असा एक लाख चार हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला. भोसले यांनी याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात सुनील गोपीनाथ गवळी (वय ३८) यांच्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी रोकड आणि कपाटातील चांदीचे पैंजण लांबविले. गवळी यांनी या संदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

वडगाव बुद्रुक भागातील जाधवनगर येथील रहिवासी पांडुरंग गंगाराम भालेकर (वय ६६) यांच्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविले. जाधव यांचे शेजारी अनंत वणगे यांच्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. वणगे यांच्या घरातून नेमका किती ऐवज चोरीस गेला, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

हडपसर भागातील त्रिमूर्ती सोसायटीतील सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने आणि रोकड असा ४५ हजारांचा ऐवज लांबविला. याबाबत अमोघ प्रमोद रुपनर (वय २७) यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.