काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी सेवा कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे आयोजन केले होते.त्या कार्यक्रमाच्या समारोपास काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आले होते. या कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी गटनेते आबा बागूल यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवन येथील कार्यक्रमास हजेरी लावली होती.पण या कार्यक्रमाला शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीच दांडी मारल्याने, तो चर्चेचा विषय ठरला असून यातून पक्षांतर्गत गटबाजी समोर आली.
हेही वाचा >>> धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून नव्हे…परळीतून या व्यक्तीने केला पैशांसाठी फोन!
काँग्रेस भवन येथे कार्यक्रम होत असून शहराध्यक्ष कार्यक्रमाला नाहीत.त्या बाबत बाळासाहेब थोरात यांना विचारले असता ते म्हणाले की, अरविंद शिंदे यांच्याशी माझ फोन वर बोलून झाल असून ते एका कामात आहे.त्यामुळे ते येऊ शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व घडामोडी बाबत काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जोशी यांनी आजच्या कार्यक्रमाकरीता काँग्रेस भवन येथील हॉल पाहिजे.याबाबत पत्र व्यवहार केला होता.त्यानुसार कार्यक्रमाला हॉल उपलब्ध करून दिला.पण आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते.त्यामुळे मी कार्यक्रमाला आलो नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस भवन येथील कार्यक्रमाला शहराध्यक्ष आले नसल्याने काँग्रेस पक्षातील गटबाजी चव्हाटय़ावर आल्याचे स्पष्ट झाले.