पुणे : राज्य शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या समान पाणीपुरठा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिटी टास्क फोर्स स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या आदेशाला महापालिकेने केराची टोपली दाखविली आहे. राज्य शासनाच्या आदेशानंतरही सिटी टास्क फोर्स स्थापन न झाल्याने राज्य शासनाने महापालिकेला स्मरणपत्र पाठविले आहे.
सर्व शहरातील घरांना नळ जोडणी देऊन पाणीपुरवठ्याबाबत १०० टक्के स्वयंपूर्ण करणे हे अमृत अभियान योजनेचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. शासनाच्या आदेशानुसार अमृत २.० अभियानाअंतर्गत समान पाणीपुरवठा योजनेसाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आले असून, शहर पातळीवरीही टास्क फोर्स स्थापन करणे बंधनकारक आहे.
हेही वाचा – पोलिसांचे ‘कानावर हात’
राज्य शासनाच्या सूचनेनंतरही महापालिकेने टास्क फोर्सची स्थापना न केल्याने मार्च महिन्यात महापालिकेकडे पत्राद्वारे विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने राज्य शासनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून, समिती स्थापन करण्यासंदर्भातील स्मरणपत्र महापालिकेला पाठविण्यात आले आहे.