पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनांमध्ये हाणामारी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा विद्यापीठात राजकीय राडा झाला. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
हेही वाचा – केळीच्या विम्यासाठी दहा हजार बोगस अर्ज; जळगावमधील प्रकार
हेही वाचा – पुणे : ससून रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या सहा जणांची सुटका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले विद्यापीठातील वसतिगृहाच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याबाबत कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली होती. या प्रकाराच्या निषेधार्ध भारतीय जनता पक्षातर्फे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर भाजपाचे कार्यकर्ते आणि विद्यापीठात सदस्य नोंदणी करत असलेल्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. या वेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.