पौड रस्ता परिसरात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली असून पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज देवीदास ओव्हाळ (वय ३४, रा. भीमनगर, पौड फाटा, कोथरुड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार अनिकेत राजेंद्र डिचोलकर (वय २०) आणि त्याच्या मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- मावळमधील जमीन खरेदी प्रकरणी सात लाखांची फसवणूक; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ओव्हाळ पौड फाटा परिसरात थांबला होता. त्या वेळी डिचोलकर आणि साथीदाराने शिवीगाळ केली. ओव्हाळने आरोपींना जाब विचारला. तेव्हा आरोपींनी त्याला मारहाण करुन कोयत्याचा दांडा मारला. या प्रकरणाचा अधित तपास पोलीस उपनिरीक्षक पांढरे तपास करत आहेत.
हेही वाचा- पत्नीचा छळ करणाऱ्या पोलिसाविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, अनिकेत डिचोलकर याने परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार मनोज ओव्हाळ, गणेश ओव्हाळ, करण पायाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिचोलकर आणि त्याचा मित्र सागर थांबले होते. त्या वेळी मनोजने त्यांना शिवीगाळ केली. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपींनी डिचोलकरला मारहाण केल्याचे परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.