मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट भागात वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेततौसिफ उर्फ अमन दस्तगीर शेख (वय २२), अल्ताफ मोहमंद शेख (वय २०, दोघे रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्या बरोबर असलेल्या पाच ते सहा साथीदारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरोपींनी केलेल्या मारहाणीत विकास सावंत, विकी लोखंडे, अजय लोखंडे जखमी झाले आहेत. उमेश सावंत (वय ३२) याने या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.उमेश आणि त्याचा भाऊ विकास रात्री मित्रांबरोबर गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपींनी विकास, विकी आणि अजय यांच्यावर शस्त्राने वार केले. आरोपींनी परिसरात दहशत माजविली.

हेही वाचा : पुणे : पीएमपी चालकाला बेदम मारहाण ; मुजोर मोटारचालकासह चौघांच्या विरोधात गुन्हा

दरम्यान, मोटारीचा धक्का लागल्याने झाल्याने वादातून एका तरुणावर शस्त्राने वार करण्यात आल्याची परस्पर विरोधी तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे. आदिल (पूर्ण नाव नाही) असे जखमी झालेल्याचे नाव आहेत. या प्रकरणी उमेश सावंत, विकी लोखंडे, आकाश लाेखंडे, विकास लोखंडे, राहुल लोखंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी तपास करत आहेत.