मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट वसाहतीत वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून सहा महिलांसह वीस जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत. हाणामारीच्या घटनेनंतर या भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेकायदा जमाव जमवून मारामारी करणे, बेकायदा शस्त्रे बाळगण्याचे आणि दुखापत केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन गटांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या बाबत कुलसुम शेख आणि जैनब इराणी (दोघी रा. शिवाजीनगर) यांनी परस्परांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. प्रतिस्पर्धी गटाने हल्ला केल्याचे कुलसुम यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. त्यानुसार महंमद शौकत शेख, जैनब फिदा इराणी, नर्गिस समीर इराणी, शहजादी उर्फ मुथडी जावेद इराणी (वय ४३, सर्व रा. शिवाजीनगर) यांच्यासह दहा जणांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>>पुणे : सलग दुसऱ्या आठवड्यात फळभाज्यांची आवक कमी; मागणी नसल्याने फळभाज्यांचे दर स्थिर

वर्चस्वाच्या वादातून माझ्यावर, तसेच कुटुंबियांवर हल्ला करण्यात आल्याची फिर्याद जैनब इराणी (रा. महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर) यांनी नोंदवली आहे. या प्रकरणी महमद हुसेन इराणी, गुलामनबी हुसेन इरानी, कुलसुम महंमद शेख, सकीना फिरोझ इरानी, सनोबर हुसेन इराणी आणि राणी हुसेन इराणी (सर्व रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांच्यासह दहाजणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. खडकी पाेलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clash between two groups in patil estate area due to supremacy dispute pune print news rbk 25 amy
Show comments