पिंपरी : चिंचवडमधील संत तुकाराम भागात दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेप्रकरणी चार जणांना गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. दोन गटात सिमेंटच्या मोठ्या गट्टूने मारहाण करण्यात आली.

एक जण दुसऱ्याच्या अंगावर धावून जात कानशिलात लागवल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर त्या तरुणाला इतरांनी मारहाण केली. दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. एकाने भला मोठा सिमेंटचा गट्टू उचलून एकाच्या पाठीत घातला. तर दुसऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सजग नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल नसला तरी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.

इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. ही हाणामारी ब्लिंकइट ऑनलाइन डिलिव्हरीच्या ऑर्डर वरून वाद झाली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Story img Loader