पुणे : येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी १६ कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकाश शांताराम येवले, प्रणव अर्जुन रणधीर, विजय चंद्रकांत वीरकर, सचिन शंकर दळवी, मुकेश सुनील साळुंखे, श्री गणेश वाघमारे, आदित्य नानाजी चौधरी, किरण रमेश गालफाडे, आकाश उत्तम शिनगारे, विशाल रामधन खरात, रुपेश प्रकाश आखाडे, रोहित चंद्रकांत जुजगर, शुभम गणपती राठोड, अनराग परशुराम कांबळे, मेहबूब फरीद शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कारागृह अधिकारी हेमंत इंगोले यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सयेरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक तीन आणि बराक क्रमांक आठमध्ये कैद्यांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी झाली. हाणामारीत दगड, तसेच पत्र्याच्या तुकड्यांचा वापर करण्यात आला. कारागृहातील बराकीत वर्चस्वाच्या वादातून हाणामारीची घटना घडल्याचा संशय आहे. येरवडा कारागृह प्रशासनाकडून पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.