पिंपरी चिंचवड : पुणे-मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सिंहगड एक्सप्रेस ही जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. मात्र जीवन वाहिनी असलेल्या एक्सप्रेस मध्ये आज जागेवर बसण्यावरून तुंबळ हाणामारी झाली आहे. ही घटना सकाळी पावणे सातच्या सुमारास घडली आहे. तसेच पिंपरी चिंचवड स्थानकात सिंहगड एक्सप्रेसचा थांबा असतो. ट्रेनमध्ये या स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पिंपरी चिंचवड साठी या ट्रेनला स्वतंत्र बोगी देण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड रेल्वे संघाचे अध्यक्ष इकबाल मुलाणी यांनी केली.

हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

हेही वाचा : विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

पुणे- मुंबई सिंहगड एक्सप्रेस मध्ये आज सकाळी पावणे सातच्या सुमारास रेल्वेतील जागेवर बसण्यावरून चाकमान्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेमुळे पुन्हा एकदा पिंपरी, चिंचवडला स्वतंत्र बोगी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच या मागणीसंदर्भात रेल्वे प्रशासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र वारंवार सांगूनही रेल्वे प्रशासन योग्य निर्णय घेत नसल्याने आम्हाला शेवटी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा पिंपरी-चिंचवड रेल्वे संघाचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी दिलाआहे.