विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्वाची मानली जाणा- या इयत्ता बारावीच्या परीक्षेस आज पासुन सुरुवात झाली शिरुर तालुक्यातील ७ केंद्रावरुन ५३२२ विद्यार्थी यंदा बारावीची परीक्षा देत आहे . शिरुर शहरा तील दोन केंद्रासह न्हावरा , मांडवगण फराटा , तळेगाव, ,व पिंपळे जगताप , जातेगाव या केंद्रावर आज पासुन परीक्षेला सुरुवात झाली आज परीक्षेच्या पहिल्या दिवस असल्याने अनेक पालक आपल्या पाल्याना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आले होते . शिरुर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर एकुण २००५ विद्यार्थी परीक्षा देत आहे तर संपुर्ण शिरुर तालुक्यात एकुण ७ केंद्रावरुन ५३२२ विद्यार्थी परीक्षा देत आहे .
सर्वाधिक विद्यार्थी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरुरच्या केंद्रावर २००५ विद्यार्थी ,विद्याधाम प्रशाला शिरुर -७०१ ,वसंतराव डावखरे ज्युनिअर कॉलेज पिपळे जगताप – ६५० श्री . संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालय जातेगाव -६०३ , मल्लिकार्जून ज्युनिअर कॉलेज न्हावरे येथे ३७९ ,रायकुमार गुजर प्रशाला तळेगाव -६२२ ,वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा -३६२ विद्यार्थी परीक्षेला बसल्याचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी सांगितले .
दरम्यान बोरा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम , प्राचार्य डॉ . के .सी .मोहिते , दक्षता समिती सदस्य शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष नोटरी सुभाष पवार , सामाजिक कार्यकर्ते रवींद्र धनक ,माजी नगराध्यक्षा मनिषा गाबडे ,यांनी परीक्षार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देवुन केले . यावेळी उपप्राचार्य हरिदास जाधव , प्रा . डॉ . अंबादास केत ,कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. अर्जुन वनवे , प्रा. रतनकुमार ससाणे , प्रा . नंदकुमार पाटील , प्रा . किशोर थोपटे ,प्रा.निर्मला संकपाळ , प्रा. बाळसाहेब नान्नोर ,दक्षता समिती सदस्य माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे , सामाजिक कार्यकर्ते रवींद्र धनक , प्रा. सतीश धुमाळ , , आदी उपस्थित होते .
फोटो ओळी बोरा महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देवुन केले .