पिंपरी : स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराच्या कामगिरीत यंदा सुधारणा झाली आहे. शहराचा देशात तेरावा, तर राज्यात तिसरा क्रमांक आला आहे. दरम्यान, मागील दोनवर्षे शहराचा एकोणीसावा क्रमांक होता.

केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदिपसिंह पुरी यांच्या हस्ते आयुक्त शेखर सिंह, सहायक आयुक्त यशवंत डांगे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला. केंद्र सरकारच्या वतीने देशात २०१६ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यास सुरूवात केली. पहिल्याच वर्षी शहराचा स्वच्छतेमध्ये नववा क्रमांक आला. त्यानंतर शहर स्वच्छतेमध्ये सातत्याने पिछाडीवर गेले होते. त्यामुळे महापालिकेने विविध पातळ्यांवर जनजागृती आणि उपक्रम सुरू केले.

do really Nagpur is better than Mumbai
Video : खरं मुंबईपेक्षा नागपूर चांगलं आहे का? राजधानी व उपराजधानी, कोणते शहर उत्तम? नेटकरी स्पष्टच बोलले…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mumbai High Court air pollution mumbai city
मुंबईकरांनी आणखी किती काळ धुक्याचे वातावरण पाहायचे ? वायू प्रदुषणाची समस्या कायम असल्यावरून उच्च न्यायालयाची विचारणा
new york city charges congestion fee peak-hour traffic
न्यूयॉर्कमध्ये वाहनचालकांना द्यावे लागणार ‘वाहतूक कोंडी शुल्क’! काय आहे ‘कंजेशन प्रायसिंग’? मुंबईतही अमलात येऊ शकते?
thane dhol tasha recovery
ठाणे : थकीत कर वसुलीसाठी पालिकेने वाजविले ढोल ताशे, नौपाडा विभागात पालिका प्रशासनाकडून कारवाई
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती
Air Quality Byculla , Air Quality Borivali,
बोरिवली व भायखळ्यातील निर्बंध उठले, ‘हे’ भाग निरीक्षणाखाली, वायू प्रदूषणासंदर्भात पालिका आयुक्तांनी दिला इशारा
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!

स्वच्छतागृह, सार्वजनिक स्वच्छतागृह महिलांना चालविण्यासाठी दिले. ओला, सुका कचरा वर्गीकरण, कचरा संकलन मोहीम राबविली. सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणाऱ्यांवर कारवाईसाठी ग्रीन मार्शल पथकाची नेमणूक केली होती. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत देश पातळीवर शहरांच्या स्वच्छतेबाबतचे परीक्षण करण्यात आले. सेवा स्तर गुणांक, नागरिकांचा प्रतिसाद आणि कचरा, हागणदारी मुक्त शहर या घटकांवरती केंद्र शासनाने नेमलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करण्यात आले.

असे मिळाले गुण

घरोघरी कचरा संकलनात ९९, कचरा विलगीकरण ८७, कच-यावर प्रक्रिया, रहिवाशी परिसर, बाजारपेठेतील स्वच्छतेला प्रत्येकी १००, सांडपाण्याचा फेरवापर, सार्वजनिक स्वच्छतागृहे यामध्येही प्रत्येकी १०० गुण मिळाले आहेत.

२०१६ पासूनची क्रमवारी

स्वच्छ सर्वेक्षणात सन २०१६ मध्ये शहराचा देशात नववा क्रमांक आला होता. २०१७ मध्ये ७२, २०१८ मध्ये ४३, २०१९ मध्ये ५२, २०२० मध्ये २४, २०२१ आणि २०२२ मध्येही १९ वा क्रमांक आला होता. २०२३ मध्ये सुधारणा होत तेरावा क्रमांक आला आहे.

याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, स्वच्छ सर्वेक्षणात क्रमवारी सुधारावी, यासाठी गेल्या वर्षभरापासून विविध उपक्रम राबविण्यात आले. शहरवासीयांनीही मोठे सहकार्य केले. त्यामुळेच स्वच्छ सर्वेक्षणात सुधारणा झाली. आगामी काळात शहर कसे स्वच्छ राहील, याकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

Story img Loader