पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन चार महिन्यांचा कालावधी होऊन गेला त्यानंतर काल राज्यातील अनेक भागांत ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यामध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची महायुती आणि शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस महाविकास आघाडी या दोन्हींपैकी कोणत्या विचाराच्या ग्रामपंचायतीच्या पॅनलला मतदान केले जाते याकडे सर्वांचे होते. हवेली तालुक्यात शरद पवार यांच्या पॅनलला पसंती मिळाल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे: सुनेशी अश्लील वर्तन; सासऱ्यावर गुन्हा

हेही वाचा – पुणे: सोसायटीतील दुकानदाराकडून दहा वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य

काल पुणे जिल्ह्यातील मुदत संपणार्‍या २३१ पैकी १८६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर १४२ पैकी ३१ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक पार पडली. पुणे जिल्ह्यात रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८०.५२ टक्के इतके, तर पोटनिवडणुकीत ७९.६८ टक्के इतके मतदान झाले. आज हवेली तालुक्यातील कोलावडे साष्टे, खामगाव मावळ येथील मतमोजणी मामलेदार कचेरी येथे पार पडली. निवडणुकीत हवेली तालुक्याने महायुतीला नाकारत शरद पवारांच्या विचाराच्या पॅनलला मतदान केल्याचे पाहायला मिळाले. पेठ २ सदस्य पदासाठी पल्लवी सुरज चौधरी, आळंदी म्हटोबा १ सदस्य पदासाठी शंकर शिवाजी जवळकर आणि हिंगणगाव १ सदस्य पदासाठी मंगल थोरात हे विजयी झाले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clear majority in favor of sharad pawar group panel in haveli taluka svk 88 ssb