लोकसत्ता, प्रतिनिधी

पुणे: हवामान विभागाने नंदूरबार, धुळे, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी दुपारनंतर वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने विजा कोसळण्याचा इशारा दिल्यामुळे स्थानिक नागरिकांनी, शेतमजूर, शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारनंतर नंदूरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागाला ३० ते ४० किलोमीटर प्रती तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे घराचे, गोठ्यांचे छप्पर उडणे, झाडे पडणे, फांद्या तुटून जीवित, वित्तहानी होण्याच्या घटना घडू शकतात. दुपारनंतर विजांच्या कडकटासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेतात काम करणाऱ्या शेतमजूर आणि शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

आणखी वाचा-पुणे: गुंतवणुकीच्या आमिषाने संगणक अभियंत्याची ५० लाखांची फसवणूक

मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात तापमान वाढीचा कल आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचाही सामना नागरिकांना करावा लागला आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यात बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. त्यासह स्थानिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून दुपारनंतर ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे, असेही कश्यपी म्हणाले.

Story img Loader