तैलबैला गडावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या गिर्यारोहकाचा दोर तुटल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.सोमनाथ बळीराम शिंदे (वय २५, रा. कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. सोमनाथ आणि त्याचे मित्र रविवारी मुळशी तालुक्यातील तैलबैला गडावर गिर्यारोहणासाठी गेले होते. सोमनाथ गडावर जाऊन दोर बांधणार होता. त्यानंतर त्याच्या बरोबर असलेल्या नऊ सहकारी दोराच्या सहायाने चढाई करणार होते.

हेही वाचा >>>पुणे: तापमानात वाढ, पावसाची हजेरी; आणखी दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता

दोर बांधण्याचे काम सोमनाथ करत होता. त्या वेळी दोर तुटल्याने सोमनाथ खाली कोसळला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सोमनाथचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.तैलबैला गड दुर्गम आहे. गडावर अनेक हौशी गिर्यारोहक गिर्यारोहणासाठी येत असतात. दोर तुटून गिर्यारोहक दोनशे फूट खाली कोसळल्याची घटना उघडकीस आल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Story img Loader