महापौर, आमदारांच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची टीका
तीर्थक्षेत्र आळंदीत होणारा दूषित पाणीपुरवठा हे पिंपरी-चिंचवडचे पाप आहे, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी पालिकेचे जाहीरपणे कान टोचले. विशेष म्हणजे पिंपरीचे नवे ‘कारभारी’ आमदार महेश लांडगे व शहराचे महापौर नितीन काळजे या वेळी व्यासपीठावर होते.
[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]
आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाळा भेगडे, महेश लांडगे, बबनराव पाचपुते, पिंपरीचे महापौर नितीन काळजे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी आमदार उल्हास पवार, संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे, मारूतीबाबा कु ऱ्हेकर, रामराव महाराज ढोक आदी उपस्थित होते. शिक्षण संस्थेच्या कार्याचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी संस्थेच्या कार्यासाठी एक कोटी रूपयांचा निधीची घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले, की आळंदी, पंढरपूर ही कोटय़वधी जनतेची श्रद्धास्थाने आहेत. त्यांचा विकास करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. राज्यातील सर्व नद्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे. आळंदीच्या र्सवकष विकासाबरोबरच येथे येणाऱ्या वारक ऱ्यांना शुद्ध पाणी देण्याची गरज असून त्यासाठी अपेक्षित निधी राज्यसरकार देईन. या कार्यक्रमासाठी येत असताना इंद्रायणी नदीचे दर्शन झाले. नदीची अवस्था पाहवली नाही. नदीचे दूषित पाणी हे पिंपरी पालिकेचे पाप आहे, जे नदीच्या माध्यमातून वाहत आले आहे. पिंपरी-चिंचवडमधून स्वच्छ पाणी निघाले पाहिजे, जेणेकरून तेथील घाण इकडे येणार नाही, याचा प्रयत्न करावा. पांडुरंगाच्या आशीर्वादाने पिंपरी, आळंदी आपल्याकडे आले आहे.
या सांप्रदायाचा प्रसार करून सुसंस्कारित पिढी घडवण्याचे बहुमूल्य काम आळंदीतील ही वारकरी संस्था करत आहे, असे कौतुक त्यांनी केले.
शिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी अन् व्यापारही’
शिक्षणाच्या नावाखाली ‘दुकानदारी’ सुरू असल्याची खंत अण्णा हजारे यांनी भाषणात व्यक्त केली. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रात तसेच देशातही शिक्षणाचा व्यापार सुरू असल्याचे सांगत अनेक जण त्यात सहभागी झाले आहेत, अशी टिप्पणी केली.
[jwplayer aMCk4gbs-1o30kmL6]