दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची अद्यापही फी माफ झालेली नाही ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्याच्या बालेवाडी येथे आज (दि.9) हा प्रकार घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेलो इंडिया गेम्सचे उद्घाटन करायला म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असताना गोंधळ उडाला. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची अद्यापही फी माफ झालेली नाही ही बाब लक्षात आणून देण्यासाठी काही जणांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. भेट शक्य न झाल्याने त्यांनी एक रकमी एफआरपी व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बेताल वक्तव्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याजवळ घोषणाबाजी केली. परिणामी, शर्मिला येवले,अमोल हिप्परगे, प्रविण भोसले, सौरभ वळवडे या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे चौघं स्वाभिमानी युवा आघाडीचे पुणे येथील पदाधिकारी असल्याची माहिती आहे. यातील अमोल हिप्परगे हा प्रदेशाध्यक्ष आहे, तर शर्मिला येवले ही उपाध्यक्ष आहे.