पुणे : दीड वर्षांपूर्वी राजकीय धाडस केले. या धाडसाला चांगले कथानक आहे. त्यामुळे नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष जब्बार पटेल यांनी या कथानकाचा विचार करावा. तुम्ही अभिनेते आहात तर आम्ही नेते आहोत. तुमच्या कलेला टाळ्यातून रसिक दाद देतात आणि नागरिकांची कामे केल्यानंतर मतदार मतपेटीतून आम्हाला दाद देतात. त्यामुळे नेते आणि अभिनेते या दोघांना प्रयोगशील रहावे लागेल अशी फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्षातील ३६५ दिवस चोवीस तास अभिनय करणारे राजकीय कलाकार व्यासपीठावर उपलब्ध आहेत. हे चोवीस तास अभिनय करतात आम्ही केवळ तीन तास अभिनय करत असतो, या नाट्य अभिनेते, संमेलनाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या विधानाचा आधार घेत मुख्यमंत्र्यांनी शाब्दिक फटकेबाजी केली.

हेही वाचा : “आता आमचा नाट्य क्षेत्रात हस्तक्षेप वाढणार”; उद्योगमंत्री उदय सामंत असे का म्हणाले?

दीड वर्षांपूर्वी एक राजकीय अंक पार पडला. दुसरा अंक सध्या सुरू आहे. मतदानानंतर विजयाचा तिसरा अंक सर्वंसमोर पुढे येईल, अशा शब्दात त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde comment on his political courage in natya sammelan pune print news apk 13 pbs