वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभेला मांजरी बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणाची सुरवात करताना म्हणाले की, ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते ते शरद पवार साहेब. तसेच जयंत पाटील यांच्याही तोंडात साखर असते. असे म्हणताच कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, विश्वजीत कदम यांच्यासह वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेचे विश्वस्त, नियामक मंडळाचे सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, करोना काळात साखर कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदत केल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. ऊस उत्पादक शेतकरी वर्गासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. हे लक्षात घेऊन आमचे सरकार आल्यावर ३१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आहे. सिंचन विभागाचे १८ प्रकल्प मार्गी लावले असून, जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेचा फायदा अधिकाधिक शेतकरी वर्गाला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – शरद पवारांसमोरच एकनाथ शिंदेंचा दावोस करारांवरून विरोधकांना टोला; म्हणाले, “कुणी काहीही…!”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी आजवर अनेक वेळा भेट झाली. त्यावेळी राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न मांडले आहे. आपल्या राज्यातील शेतकरी वर्गासोबत केंद्र सरकार कायम आहे. तसेच कृषी क्षेत्रात शरद पवार यांचे फार मोठ योगदान आहे. त्यांना कृषी क्षेत्राबद्दल आत्मीयता असून गाढा अभ्यास देखील आहे. शरद पवारांनी नेहमी मार्गदर्शन करावे, ज्याचा सहकार, कृषी आणि सरकारला फायदा होईल.

मी दावोसला जाऊन आलो : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्‍यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यावरून भाषणादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात उद्योग येण्यासाठी मी दावोसला जाऊन आलो. त्यामध्ये हजारो कोटींचे करार झाले आहे. त्यामुळे आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक आली आहे. त्यावर कोणी काही म्हणू दे, असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

हेही वाचा – पुणे : रिंगरोडसाठी स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांना जागेवरच मिळणार मोबदल्याचे धनादेश

साखर कारखान्यांनी यापुढे इथनॉल, सीएनजी, हायड्रोजन उत्पन्न घेतले पाहिजे : शरद पवार

जालना जिल्ह्यात १७० एकर जमीन खरेदी केली आहे. त्यावर विविध जातींच्या उसांचे उत्पादन घेतले जात आहे. या पुढील काळात आणखी काही जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून ऊस उत्पादकांसाठी विविध जातीचे ऊस आणि खते उपलब्ध करून दिली जाणार आहेत. खानदेशात ही अशी एखादी संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न असून त्याचा फायदा त्या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.

शरद पवार म्हणाले की, भारताने २०२१ – २२ मध्ये सर्वाधिक ११ लक्ष टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. महाराष्ट्राने उत्तर प्रदेशपेक्षा जास्त साखरेचे उत्पन्न मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्यात १९८ साखर कारखाने आतापर्यंत सुरू असून, १३८ लाख टन सारखेचे उत्पन्न होणार आहे. तसेच राज्यातील १०६ कारखान्यांनी इथेनॉलाचा पुरवठा केला आहे. त्यामुळे इथेनॉलच्या मागणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, साखर कारखान्यांनी यापुढे इथनॉल, सीएनजी, हायड्रोजन उत्पन्न घेतले पाहिजे. त्यामुळे आर्थिक मदत होणार.