Chhatrapati Shivaji Maharaj Janmotsav पुणे : छत्रपती शिवराय आई भवानीला कौल मागण्याइतके धार्मिक होते. तेवढेच ते व्यवहारी आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी मायेने आपल्या प्रजेचा सांभाळ केला. छत्रपती शिवरायांनी तलवार हाती घेतली पण ती कधी निष्पापांच्या रक्ताने माखून दिली नाही. त्यामुळे शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकुशलतेचे सोमवारी वर्णन केले.

किल्ले शिवनेरीवर झालेल्या शिवजन्माच्या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थित होती. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते.

Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Shani Pluto Ardhakedra Yog
२२ जानेवारीला शनि-यम निर्माण करणार शक्तीशाली योग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, अचानक होईल धनलाभ
Indian Army Day 2025 Wishes in Marathi| Happy Indian Army Day 2025
Indian Army Day 2025 Wishes : लष्कर दिनाच्या द्या भारतीय जवानांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा

हेही वाचा…पुणे विमानतळासाठी तारीख पे तारीख! पंतप्रधानांना वेळ नसल्याने नवीन टर्मिनलचे ‘उड्डाण’ होईना

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाची आठवण सांगताना शिंदे म्हणाले की, पाकिस्तानकडे तलवार रोखून धरणारा पुतळा पाहून माझ्या अंगात उर्जा संचारली. त्या पुतळ्याकडे पाहून पाकिस्तानची कधीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. लवकरच लंडनच्या वस्तुसंग्रहालयातील शिवरायांची वाघनखे भारतामध्ये आणली जाणार आहेत.

फडणवीस म्हणाले, की शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवले. अन्याय करणारा कितीही मोठा असो देव, देश आणि धर्मासाठी लढणारा जिंकतो. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढायला शिकवले. आम्हीही शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करत आहोत.  पुरातत्व विभागाच्या कामांच्या पद्धतीमुळेच गड किल्यांच्या विकासाला अडथळा येतो. मात्र, यामधे बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा…पंतप्रधानांमुळे लटकली पुणे मेट्रो! विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर

पवार म्हणाले, की सर्व जाती, धर्मांना एकत्र करून गुलामगिरीच्या विरोधात लढले पाहिजे हे शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनावर बिंबवले. महायुती सरकार गड-किल्ल्यांसाठी काम करत असून गडासाठी ८३ कोटी खर्च करण्यात आले आहेत. या बरोबरच इतर गडकिल्ल्यांच्या जिर्णोद्धार करण्याचे काम करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Story img Loader